आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या मदतीने पीडित महिलेला मिळाला न्याय
✒️संदेश साळुंके✒️
प्रतिनिधी
📞9011199333📞
श्रीरामपूर येथील रहिवासी असलेली पिढीत महिला राजश्री गायधने या गेल्या १५ दिवसांपासून सासरी व माहेरी होणाऱ्या छळास कंटाळून बेपत्या झाल्या होत्या. पती अमोल संभाजी गायधने यांच्याशी ७ वर्षांपूर्वी आई वडिलांच्या जबरदस्तीने वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले होते. गेली ७ वर्षात शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ सासरकडून होत आहे, याची वारंवार कल्पना पीडित महिलेने आई-वडिलांना दिली होती. सतत पतीकडून आत्महत्येची धमकी देणे, संशय घेऊन व दारू पिऊन मारहाण करणे, घरात कॅमेरे बसवणे अशा त्रासाला कंटाळून भीतीपोटी या महिलेने घर सोडले व उदरनिर्वाहासाठी नोकरीस लागली.
परंतु माहेरच्या लोकांनी मुलीचा पत्ता लागत नसल्याने पोलिसांना उपोषणाची धमकी दिली होती. त्याचप्रमाणे पतीने पोलीस स्टेशनला पत्नी बेपत्ता असल्याचे केस केली होती. या केसचा तपास श्रीरामपूर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार हे करत होते. त्यांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. राजश्री गायधने हीस पोलीस स्टेशनला हजर होण्यास सांगितले, परंतु पीडित महिला अतिशय घाबरलेली असल्याने ती सासरे व माहेरी जाण्यास तयार नव्हती. संगमनेर येथील पत्रकार विशाल बुळकुंडे यांच्या मदतीने आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या महा. राज्य सचिव रेणुका दिघे यांच्याशी तिने संपर्क साधला. त्यांनी वकिल सुबोध शिंदे यांच्याशी चर्चा करून रात्री १२.०० वाजता श्रीरामपूर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडित महिलेची व्यथा समजून घेऊन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, ठाणे अंमलदार संतोष परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार, चालक गिरी यांच्या मदतीने मिसिंगची केस मागे घेत आरोपी पती अमोल संभाजी गायधने याच्याविरुद्ध केस दाखल करत त्यास ताब्यात घेतले. आई, वडील, भाऊ यांच्याशी मुलीची भेट घालून देण्यात आली. मुलींनी पतीकडे रितसर फारकतीची मागणी केली आहे.
या कामे महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. दीपेश पष्टे संचलित आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या महा.राज्य सचिव रेणुका दिघे, पत्रकार विशाल बुळकुंडे, राजेश जाधव, नीलकंठ घोडेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील दिघे यांनी अनोळखी महिलेला न्याय मिळवून देण्यास मदत केली आहे. रात्री १२:०० ते स. ६:०० वाजेपर्यंत श्रीरामपूर पोलिसांनी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले आहे.यापुढील तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्र शेलार हे करत आहे.