श्री रविप्रभा मित्र संस्थेचे काम हे कौतुकास्पद.. म्हसळा वैद्यकीय अधीक्षक डॉ महेश मेहता.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगाव : दि.२४ डिसें रोजी म्हसळा शहरात श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे व्दितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हसळा वैद्यकीय अधीक्षक डॉ महेश मेहता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड व डॉ.धलाई यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ महेश मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की श्री रविप्रभा मित्र संस्थेचे कार्य खूप कौतुकास्पद आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक तसेच आरोग्य या विषयावर काम करीत असताना कोरोना काळात या संस्थेचे आमच्या आरोग्य यंत्रणेला मोलाचे सहकार्य लाभले, या वेळी देखील मी या संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांना विनंती करतो की या पुढे असे कोरोनासारखे कोणतेही संकट आले तर आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला सहकार्य करावे असे देखील डॉ मेहता यांनी आवाहन केले.कोरोनासारख्या आजाराला घाबरण्याचे कारण नाही पण प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, नियमांचे पालन केले पाहिजे असा सल्ला देखील कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.नेत्र तपासणी शिबिर हे नेत्र रोगाचे निदान करण्यासाठी आहे.आणि मी म्हणेन की या संस्थेला कोणत्याही शिबिराची गरज नाही ही संस्था उज्वल आहे. शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक नागरीकांना तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचे कार्य करावे असे मी सांगु इच्छितो ,खर म्हणजे मी कोणत्याही प्रकारचे शिबिर घेऊ नये या मताचा मी आहे कारण जे शासनाने केले पाहिजे ते काम आमची संस्था करते, मग शासन या सर्व गोष्टींचा कधी विचार करणार असे संस्थेचे सदस्य अनिल काप यांनी स्पष्ट केले.संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी सांगितले की आज नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे आणि आपले सर्वांचे सहकार्य लाभले या मुळे मी खूप समाधान व्यक्त करतो, डॉ पाठक यांनी देखील संस्थेचे कार्य खूप छान आहे आणि मी या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, या शिबिराच्या माध्यमातून दोनशेहून अधिक लाभार्थी यांनी शिबिराचा लाभ घेतला,येणारे लाभार्थी यांना संस्थेकडून चहा, नाश्ता याची व्यवस्था करण्यात आली होती,व तपासणी झाल्यानंतर देण्यात येणारे मेडीसीन संस्थेकडून मोफत देण्यात आली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित काते यांनी केले तर प्रस्ताविक श्रीकांत बिरवाडकर यांनी केले व आभार संतोष उध्दरकर यांनी मांडले या वेळी उपस्थित म्हसळा वैद्यकीय अधीक्षक डॉ महेश मेहता, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड डॉ.दिपक पाठक, डॉ.धलाई, हिंदू ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष महादेव पाटील, रफिक चणेकर,शकुर घन्सार, सुरेश कुडेकर, जेष्ठ पत्रकार उदय कळस, पत्रकार अशोक काते, पत्रकार निकेश कोकचा,अमित महामुणकर, निलेश मांदाडकर, कौस्तुभ करडे, दादा पानसरे, तुकाराम महाडिक, संस्थेचे सचिव नितीन रिकामे, खजिनदार सुशांत लाड, सल्लागार संतोष उध्दरकर, दत्तात्रय लटके, अनिल काप,श्रीकांत बिरवाडकर, सुजित काते, समीर लांजेकर,किरण मोरे, किशोर घुलघुले, संतोष घडशी, स्वप्निल लाड, तसेच संस्थेचे सदस्य व हॉस्पिटल कर्मचारी वर्ग व बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.