मागील २४ तासांत यवतमाळ जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

64

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

चंद्रपूर :- दरदिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, ते फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे.

भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येणारे केंद्र वगळले. याविषयीचे कारणही स्पष्ट केले नाही.

मागील वर्षी या जिल्ह्यातून सीसीआयकडे ३,५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून १ लाख ४० हजार क्विंटल कापसाची विक्री केली होती. यंदा सरकारी केंद्रच नाही तर चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस विकायचा कुठे?

आधीच तुटपुंजे दर, त्यात सरकारी केंद्र नाही, वरोरा, राजुरा, कोरपना, भद्रावतीला नेऊन कापूस विकायचा तर परवडत नाही. अशाच व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी निराशेच्या खोलात जात आहे. हिवाळी अधिवेशनासाठी सरकारचे तीनही इंजिन विदर्भात येऊनही शेतकऱ्यांसाठी काही न करताच निघून गेले .

राज्यात दरदिवशी होत असलेल्या शेतकरी
आत्महत्यांसाठी मदतीच्या आश्वासनाचे वाफा सोडणारे ट्रीपल इंजिन सरकारच जबाबदार आहे.