सरडपार आश्रम शाळेचा १९ वर्ष मुलांचा हँडबॉल संघ राज्यस्तरावर

52
सरडपार आश्रम शाळेचा १९ वर्ष मुलांचा हँडबॉल संघ राज्यस्तरावर

सरडपार आश्रम शाळेचा १९ वर्ष मुलांचा हँडबॉल संघ राज्यस्तरावर

सरडपार आश्रम शाळेचा १९ वर्ष मुलांचा हँडबॉल संघ राज्यस्तरावर
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो 8806689909

सिंदेवाही :- नुकत्याच ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये चंद्रपूर ,अहेरी, भामरागड ,वर्धा, नागपूर ,चिमूर, गडचिरोली देवरी या प्रकल्पाच्या 17, 19,व 14 मुले, मुली सहभागी असलेल्या खेळाडूंच्या विविध स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये चंद्रपूर प्रकल्पांतर्गत सरडपार आश्रम शाळेचा 19 वर्षे मुले हँडबॉल हा संघ सहभागी होता अंतिम सामन्यात चंद्रपूर संघाने ज्यामध्ये सरडपार आश्रम शाळेचे सर्व खेळाडू असलेल्या १९ वर्ष मूल्यांचा संघ सहभागी होता या संघाने भामरागड या प्रकल्पाच्या संघावर मात करून नागपूर येथे संपन्न होणाऱ्या 3 जानेवारी ते 5 जानेवारी या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला या सर्व यशस्वी खेळाडूचे व क्रीडा शिक्षक दिपक लोखंडे सर यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री बंडूभाऊ पुठ्ठावार सर, तसेच सचिव पुठ्ठावार मॅडम, शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक चन्नुरवार सर, प्राथमिक मुख्याध्यापक गणेश चेपुरवार सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व खेळाडूं विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे