खोपोली शिळफाटा येथे टँकर उलटून भयंकर अपघात

33
खोपोली शिळफाटा येथे टँकर उलटून भयंकर अपघात

खोपोली शिळफाटा येथे टँकर उलटून भयंकर अपघात

खोपोली शिळफाटा येथे टँकर उलटून भयंकर अपघात

आगीच्या तांडवात दैनंदिन जीवन विस्कळीत..

संदेश साळुंके
रायगड प्रतिनिधी
9011199333

खोपोली:- पुण्याहून खोपोली शहरात येणारा टँकर अचानकपणे पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अपघातात ज्वलनशील रसायनाने भरलेल्या टँकरला पलटी झाल्याने आग लागल्याने आगीमुळे रस्त्यालगत असलेल्या गवताने व टँकर मधील ज्वलनशील रसायनाच्या पडलेल्या द्रव्य प्रवाहाने वाहत जात रस्त्यावरच जोरदार पेट घेतला. पटेलनगर मिळ गाव कडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या दुकानामुळे त्या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते . पण त्यावेळी परिणामी पाहठ असल्याने जीवित हानी होता होता वाचल्याचे समजते. त्या भयंकर आगीत एक चारचाकी जळून घाक झाली. टँकर मधील रसायनाने पेट घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत असताना खबरदारी म्हणून या परिसरातील वाहतूक ही काही काळ थांबवण्यात आली होती. तर जवळच ट्रान्स्फरमेर असल्याने तेथील सुद्धा वीज पुरवठा ही खंडित करण्यात आला होता.

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य करण्यासाठी खोपोली नगर पालिका अग्निशमन दल, जे एस डब्लू , टाटा कंपनी,अलाना कंपनीच्या ही फायर ब्रिगेडचा संपूर्ण स्टाफ व इतर सामजिक संघटना अपघात ग्रस्त टीम व इतर स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. खोपोली शहरातील मोहन रॉकी या कंपनीमध्ये मिथेल नावाचं रसायन घेऊन जाणारा टँकर असल्याचे समजते. खोपोली नगरपरिषदेत अतिक्रमण विभाग निष्क्रिय कार्य करत असल्याने रस्त्यालगत असलेले अतिक्रमणे भविष्यामध्ये अनेक नागरिकांचे जीव घेतील अशी चर्चा यावेळेस ऐकायला मिळाली तर नगरपालिकेने या रस्त्यावरील सोसायटी इमारतीच्या सर्विस रोड साठी कुठलीही तयारी केली नसल्याने तसा आराखडा न केल्याने इंदिरा गांधी चौकापासून मिळवापर्यंत नो एन्ट्री मधून तेथील स्थानिक नागरिकांना व त्यांच्या वाहनांना जावे लागते त्यात रस्त्यालगत असलेले अनेक बेकायदेशीर दुकाने भविष्यात अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतील यात शंका वाटत नाही. या अपघाता नंतर ही सर्वसामान्य नागरिक मात्र परत एकदा आपला जीव मुठीत धरून जगेन व मरेल पण कर घेणारी खोपोली नगरपालिका मात्र यावर कधी तोडगा काढणार असा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो.