काबूल: अॅम्ब्युलन्समध्ये भीषण बॉम्बस्फोट, ४० ठार, १४० जखमी

93

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहरात एका अॅम्ब्युलन्समध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ४० जण ठार, तर १४० हून अधिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिस चेकनाक्यावरून जात असताना एका अॅम्ब्युलन्समध्ये हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. स्फोट झालेल्या परिसरात अनेक शासकीय इमारती आणि अनेक देशांचे दूतावास आहेत हे विशेष.