मुंबई: मिडीया वार्ताला मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत प्रभाकर शेटये यांचा मुलगा ओमकार प्रशांत शेटये हा डि एस शाळेतील इंग्रजी माध्यमात इयत्ता ५वीत शिकत आहे. त्यांची शाळेमध्ये अशी तक्रार होती की, दिनांक 25/1/2018 रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी शाळा भरण्याची वेळ होती, काही कारणास्तव फक्त 2 ते 3 मिनिटे ऊशिर झाला , शाळेच्या नियमानुसार मुलांना लेटमार्क शिक्का दिला जातो. तरीही ओमकारला 4ते5 तास वर्गाबाहेर थंड लादी वर खाली बसवून ठेवले. या प्रकारामुळे मुलास संध्याकाळी प्रचंड अंगदुखी ताप व शारिरीक वेदना होऊ लागल्या रात्री उशिरा पावणे बारा वाजता त्याला डॉक्टर कडे त्याला नेले असता डॉक्टरांनी चौकशी केली असता त्यांना त्यांच्या वडीलांना सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितला, खूप वेळ खाली थंड लादिवर बसल्या मुळे असा प्रकार झाला असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली. असे प्रकार या शाळेत सतत मुलांच्या बाबतीत घडत असे प्रशांत शेटये असे म्हणणे आहे. सदर प्रकरणामध्ये जे पण शिक्षण सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी ओमकार वडिलांची मागणी आहे. आम्ही मिडीया वार्ता या प्रकरणाची दखल घेत असून यावर त्वरित लक्ष घालावे अशी मागणी करत आहे. मुली चुकली की त्यांना वेळीच शिक्षा करणे योग्य आहे. परंतु त्या शिक्षेतून मुलांना मनावर आघात तर होत नाही. यांकडे सुद्धा शिक्षकाने लक्ष दिले पाहिजे.