मुंबई : राष्ट्रवादीला २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आघाडी करायचीच असेल तर ती आम्ही काँग्रेसशी करू, शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कदापि युती करणार नाही, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपविरोधात संविधान बचाव रॅलीचा एल्गार करून शरद पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारण ढवळून टाकलं आहे. या रॅलीसाठी विरोधी पक्षांसह शिवसेनेलाही साद घालून पवार २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोट बांधत आहेत, असे बोलले जात आहे. पंच्याहत्तरी गाठलेले पवार अशा प्रकारे नव्या जोमाने आखाड्यात उतरल्याने सगळ्यांचेच त्याकडे लक्ष लागले असताना पवार यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.