पत्नी दुसऱ्यासोबत पळाल्यानंतर, राग काढण्यासाठी सीरिअल किलरनं केल्या रागातून 18 महिलांची हत्या.

52

पत्नी दुसऱ्यासोबत पळाल्यानंतर, राग काढण्यासाठी सीरिअल किलरनं केल्या रागातून 18 महिलांची हत्या.

 After his wife ran away with another man, a serial killer killed 18 women out of anger.

After his wife ran away with another man, a serial killer killed 18 women out of anger.

हैदराबाद:- मध्ये एका व्यक्तीनं आपली पत्नी सोडून गेल्याच्या रागातून 18 महिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी 45 वर्षीय या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर त्यानं केलेल्या काही अन्य गुन्ह्यांचीदेखील उकल झाली आहे. त्याच्या अटकेनंतर चौकशीदरम्यान महिलांच्या हत्येची दोन प्रकरणं सोडवली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी हा दगड फोडण्याचं काम करत होता. 21 गुन्ह्यांखाली पोलिसांच्या एका टीमनं त्याला अटक केली. यापैकी 16 प्रकरणं हत्येची आणि काही प्रकरणं प्रॉपर्टी संदर्भातील होती. याव्यतिरिक्त आरोपी यापूर्वी एकदा पोलिसांच्या तावडीत पळूनही गेला होता. आतापर्यंत त्याला निरनिराळ्या प्रकरणांमध्ये अनेकदा अटकही झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वयाच्या २१ व्या वर्षी आरोपीचा विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर त्याची पत्नी एका व्यक्तीसोबत पळून गेली. यानंतर त्याच्या मनात महिलांविषयी राग निर्माण झाला. त्यानंतर 2003 पासून त्यानं गुन्हे करण्यास सुरूवात केली.

आरोपी हा मद्यविक्रीच्या दुकांच्या नजीक फिरत असे. तसंच मद्य अथवा ताडीचं सेवन करणाऱ्या महिलांना हेरून तो त्यांना ताडी प्यायला देत होते. त्यानंतर त्यांना अधिक पैसे देण्याचं सांगत त्यांच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित करत होता. त्यानंतर त्यांच्याकडे असलेलं मौल्यवान सामान चोरून तो त्यांचा खुन करत असल्याची माहिती समोर आली आहे. तूप्रान, राईदुर्गम, संगारेड्डी, दुंडीगल, नरसापुर, नारसिंगी, कुकटपल्ली, बोइनपल्ली, चंदानगर, सामीरपेट, पटान चेरु या पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीविरोधात गुन्हे दाखल आहेत.

यापूर्वी एका महिलेच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु त्यानंतर त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळए त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु 2011 मध्ये तो त्या ठिकाणाहून फरार झाला. त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा त्याला अटक झाली आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर 2018 मध्ये त्याला सोडण्यात आलं. त्यानंतरही त्यानं अनेक ठिकाणी गुन्हे आणि हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.