भोजाजी महाराज आजनसरा संस्थान येथे उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे यांना निरोप.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- चे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमरावजी टेळे यांची नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथे बदली झाली असल्याने काल 22 जानेवारीला आजणसरा येथे श्री संत भोजाजी महाराजांचे दर्शनासाठी आले असता संस्थांनचे सचिव शिवदास पर्बत, नामदेव गाढवे व पोलिस मित्र विजय आष्टनकर यांनी शाल श्रीफळ व भोजाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी भीमरावजी टेळे हिंगणघाट येथे असताना अत्यंत शिस्तप्रिय कर्तव्य दक्ष व ड्याशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात आली तसेच रेती तस्कर व दारू विक्रेत्यांवर सिंघम स्टाईलने बेधडक कारवाईचा सपाटा सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडन्यात आले होते, त्यामुळे गेल्या दोन वर्षाचे कालावधीत थोरल्यापासून तर लहान बालकांसह विशेषतः महिलांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करून दारू विक्रेते व अवैध व्यावसायिकांच्या मनात थरकाप सोडणारे पोलिस अधिकारी म्हणून टेळे यांची ओळख होती ,आपल्या दबंग प्रवृत्तींने गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ तर सामान्यांच्या प्रश्र्नाकरिता धाऊन जाणारे पोलिस अधिकारी म्हणून टेळे यांची ओळख होती यांच्या कार्य पद्धतीने प्रभावित होऊन सर्वसामान्यात त्यांना दबंग पोलिस अधिकारी मानल्या जायचे त्यांची बदली नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथे झाली असून 22 जानेवारी ला हिंगणघाट येथून रिलीव्ह करण्यात आले, काल भोजाजी महाराज संस्थान येथे टेळे यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला,यावेळी सचिव शिवदास पर्वत,नामदेव गाढवे,पोलिस मित्र विजय आष्टनकर डॉ संदीप लोंढे संजय कोसुरकर,पिंटू आश्टनकर, पोलिस कर्मचारी मनोज झाडे यांची उपस्थिती होती.