R. T. Republic Day celebrations at iComputer and Technical Institute.
R. T. Republic Day celebrations at iComputer and Technical Institute.

आर. टी. आय कॉम्पुटर अँड टेकनिकल इन्स्टिट्यूट येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

वडनेर:- वडनेर येथील युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आर. टी. आय कॉम्पुटर अँड टेकनिकल इन्स्टिट्यूट येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्वप्रथम राष्ट्रपिता माहात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुरतकर, कार्यक्रमाचे मार्गदर्शक युवा प्रेरणा संस्थेच्या कार्यक्रम नियोजन व नियंत्रण समितीचे उपाध्यक्ष विकास तिजारे, प्रमुख अतिथी नेहरू युवा केंद्र चे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन, शिक्षिका विभा गुरनुले, मीनल जारोंडे यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषाचे आत्मचरित्र वाचून स्वतःला बलवान बनवावे आणि राष्ट्रहितासाठी कार्य करावे असे मत विकास तिजारे यांनी व्यक्त केले. राष्ट्र निर्मिती करिता युवकांनी समोर येऊन देशातील शेतकऱ्याच्या पाठीशी राहावे जणेकरून आपल्या देशातील आर्थिक कणा वाचवता येईल असे मत आपल्या अध्यक्षीय भाषांनातून राहुल दूरतकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रीती पंढरे, वैष्णवी तिजारे, तेजस्वी सातपुते, शिवानी तिजारे, विनय कुंभलकर, स्नेहल चांदेकर, सौरव पोहीणकर, विनोद कोल्हे, सौरव भिसे, रोहित चंदेल, पूजा राघाटाटे , भाग्यश्री आंबटकर, हर्षा येणोरकर, दीपाली धोटे, प्रणाली ढाबाडे, प्रिया काळसकर यावेळी सूत्रसंचालन स्वीटी उमाटे तर आभारप्रदर्शन वैष्णवी सुरकार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here