भारतीय बौद्ध महासभा कळमेश्वर तालुका तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा.
युवराज मेश्राम प्रतिनिधी
कळमेश्वर:- भारतीय बौद्ध महासभा कळमेश्वर तालुका तर्फे ब्राह्मणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ब्राम्हणी येथे गणराज्य दिन शशिकलाताई चनकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला

प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला राजेंद्र ऊके यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले तुकाराम इंगळे, भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस यांनी गणराज्य दिन आणि संविधानाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती प्रास्ताविकेत दिली आणि तालुका अध्यक्ष अरुण वाहणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रजासत्ताक दिन यावर प्रकाश टाकला संचालन कोषाध्यक्ष राहुल वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दादाराव शिरसाट यांनी केले. याप्रसंगी वैशाली वाहणे लता खडसे ललिता पाटील राजकन्या पाटील बेबीताई बनसोड निखिल गोंडाणे ओमराज वासनिक अशोक सूर्यवंशी प्रभुजी कऱ्हाडे अर्चना ऊके सुलोचना वाहणे हरिष शिरसाट, अर्पणा लांजेवार रॉबिन ढोले आदी बहुसंख्येने उपस्थिती होती.