भगवंतराव महाविद्यालयात एटापल्ली येथे राष्ट्रीय मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धेचे आयोजिन

62

भगवंतराव महाविद्यालयात एटापल्ली येथे राष्ट्रीय मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धेचे आयोजिन

भगवंतराव महाविद्यालयात एटापल्ली येथे राष्ट्रीय मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धेचे आयोजिन

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.न.9405720593

*एटापल्ली:*- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे तहसिल कार्यालय एटापल्लीच्या वतीने 23 जानेवारी आणि 24 जानेवारी 2023ला चिञकला, रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले होते या स्पर्धेतील विजेत्यांना 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसी चिञकला, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक असलेल्या स्पर्धकांना श्री.पी.व्ही.चौधरी(नायब तहसिलदार, एटापल्ली) आणि प्रा.डाँ.सुधिर भगत यांच्या वतीने बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
चिञकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक अनुक्रमे प्रज्वल दयालवार, सदानंद हेडो आणि महेश तोप्या तर रांगोळी स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक अनुक्रमे प्रज्वल दयालवार, कु.मंजू उसेंडी आणि कु.कांचन कुजुर तसेच वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक अनुक्रमे महेश तोप्या, कु.संध्या नरोटे आणि चमरू नरोटे यास्पर्धकांचा क्रमांक आलेला आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाँ.सुधीर भगत तर प्रमुख अतिथी श्री.पी.व्ही. चौधरी (नायब तहसिलदार, एटापल्ली), प्रा.डाँ. शरदकुमार पाटील, प्रा.डाँ.श्रूती गृबावार, प्रा.डाँ.साईनाथ वडसकर, प्रा.राजीव डांगे, प्रा.भारत सोंनकाबळे, प्रा. चिन्ना पुंगाटी, श्री.जे.एम.सिडाम, श्री.नंदकिशोर पाचभाई आदी उपस्थित होते. याकार्यक्रमाचे संचालन प्रा.निलेश दुर्गे, तर प्रास्तविक प्रा.डाँ. व्हि.ए. दरेकार, आणि आभार प्रदर्शन प्रा.संदीप मैंद यांनी केले, यावेळी महाविद्यालयात बहूसंख्येने विद्यार्थी आणि इतर शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.