प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहेत ईच्छा असुन जमत नाही त्यासाठी कृती केली पाहिजे सुरुवात महत्त्वाची.. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी.
✍️संतोष उध्दरकर. ✍️
📞म्हसळा शहर प्रतिनिधी📞
म्हसळा :- श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड यांनी तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीवर्धन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांनी विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधत यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असते, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात स्पर्धा च असते, आयुष्यात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असतेच, ईच्छा असुन जमत नाही कृती केली पाहिजे, सुरुवात महत्त्वाची आहे, आयुष्याचा प्रवास कसा करायचा आहे हे तुम्ही ठरवायचे आहे, आपल्या धेय्याची आपणच स्पप्न पाहायची आहेत, दुसऱ्याने ठरविण्यापेक्षा स्वत ठरवा तुम्हाला काय व्हायचे आहे. कृतीमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.संवाद साधत असताना स्वामी यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न देखील विचारले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या, तसेच म्हसळा पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे यांनी देखील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व मान्यवर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करुन गौरवण्यात आले. स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी ज्या शिक्षकांनी योगदान दिले ते सर्व शिक्षक दिपक पाटील सर, चंद्रकांत बैसाणे सर, वसंत काबंडीसर, संजय वसावे सर, हनुमंत मोरे सर या शिक्षकाचा देखील सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हसळा शहरातील विद्यार्थ्यांनी अक्षता अढागळे हिने MPSC राज्यसेवा परिक्षा उत्तीर्ण होऊन म्हसळा तालुक्याचे नाव मोठे केले आहे त्या मुळे संस्थेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी व पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे व सर्व मान्यवरांच्या हस्ते विषेश सत्कार करण्यात आला. तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदार रा. काॅ. महिला अध्यक्ष पदी सोनल घोले यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे देखील संस्थेच्या वतीने विषेश सत्कार करण्यात आला. व परिक्षेसाठी परिक्षक म्हणून लाभलेले शिक्षक यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. व या परिक्षेत जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना देखील संस्थेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन कौतुकाची थाप देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले तर प्रस्ताविक श्रीकांत बिरवाडकर यांनी केले व संतोष उध्दरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .या कार्यक्रमात उपस्थित श्रीवर्धन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी, म्हसळा पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे, श्रीवर्धन नायब तहसीलदार भुरके, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, मुख्याध्यापक प्रकाश हाकेसर, उद्योजक राजगुरू, सुरेश कुडेकर, डॉ. मोईज शेख, यादव मॅडम, गायकवाड सर, अक्षता अढागळे, अशोक अढागळे, सौ. अढागळे, सरपंच वनिता खोत, सोनल घोले, महेश घोले, अमित महामुणकर तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग व संस्थेचे सर्व पदाधिकारी, महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.