म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा

58
म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा

म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा

म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा शहर प्रतिनिधी-
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- म्हसळा तालुक्यात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी शाळा नं. एक ईथे समीधा वेदक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे मुख्याध्यापक प्रकाश हाकेसर यांच्या हस्ते व नगरपंचायत येथे ध्वजारोहण नगराध्यक्ष संजय कर्णिक यांच्या हस्ते झाले तसेच म्हसळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदिपान सोनावणे यांनी ध्वजारोहण करुन ध्वजाला मानवंदना केली,तसेच ग्रामीण रुग्णालयात म्हसळा वैद्यकीय अधिक्षक महेश मेहता यांनी ध्वजारोहण करुन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या,न्यु इंग्लिश स्कूल नेवरुळ या शाळेचे ध्वजारोहण चेअरमन रविंद्र लाड यांनी करून तिरंगा ध्वजाशी एक निष्ठा राहण्याची सर्वानुमते शपथ घेण्यात आली तसेच कन्याशाळा पटांगणात शासकीय ध्वजारोहण म्हसळा तहसीलदार समीर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या वेळी म्हसळा पोलीस यांच्या कडून ध्वजाला मानवंदना देण्यात आली, तसेच तहसीलदार समीर घारे यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या,यावेळी शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते व न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोरी मल्ल प्रात्यक्षिक सादर करून तहसीलदार यांच्या सह सर्व उपस्थित यांची मन जिंकली तर रा. जि. प. मराठी शाळा व रा. जि. प. उर्दू शाळा या शाळेतील विद्यार्थी यांनी देखील देशभक्तीपर उत्तम नृत्य सादर करून दाखविले, व नेवरुळ रा. जि. प.मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना काही ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व सेल्फी पाईंट देखील लावण्यात आले होते व या प्रजासत्ताक दिनामध्ये तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या होत्या..