सरदार पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

54
सरदार पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

सरदार पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

सरदार पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 27 जानेवारी
येथील सरदार पटेल महाविद्यालयात शुक्रवार, 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयातील प्रांगणात ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांच्या हस्ते झाले.
एनसीसीच्या तुकडीने यावेळी मानवंदना दिली. प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी एनसीसी तुकड्यांच्या आकर्षक कवायतीचे निरीक्षण केले. या संचलनात एनसीसीची मुले व मुली सहभागी झाले होते. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतांना न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणे देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली असल्याचे सांगितले. विशेष कामगिरी बजाविणाऱ्या विद्यार्थांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भारतात महिलांना आज सर्व क्षेत्रात सर्वेधानिक रूपाने समान अधिकार प्राप्त आहेत. आजची महिला सामाजिक, राजनीतिक आणि आर्थिक जीवनात समानतेने जुळलेले आहेत. अनेक क्षेत्रात कार्यरत असताना महिलांना अनेक संकटाना समोर जावे लागते तरी महिला सर्व संकटांना तोंड देऊन आज चांद्रयान अभियानाला यशस्वी करण्या करिता महिलांचा खूप मोठा वाटा आहे. यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या कर्तव्य पथावर सुद्धा फक्त महिलाच पथ संचालन करणार आहेत. आणि महाविद्यालयाच्या इतिहासात सुध्दा पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या पथ संचालनाचा धुरा सिनियर अंडर ऑफिसर समीक्षा आंबटकर हिने सांभाळली आहे. ही अतिशय गर्वाची बाब आहे. यावर्षीचा बेस्ट कंटीजन पुरस्कार सुद्धा कंटीजन कमांडर ज्युनिअर अंडर ऑफिसर सौंदर्या बंडीवार  व समूहाने पटकावला आहे.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.चंद्रकांत खैरवार ,कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोंमकुवर, डॉ. कुलदीप आर. गोंड, प्रा. विक्की पेटकर, एन. सी. सी. मुली प्रमुख लेफ्टनंट कांचन रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन लेफ्टनंट कांचन रामटेके यांनी केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर,सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मनोहर तारकुंडे, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणा तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी उपरोक्त महोत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या.