पाष्टी शिवारातील नदीवर बांधला वनराई बंधारा.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान च्या अनुषंगाने २०० गोण्यांचा वापर
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-या बंधाऱ्यामुळे ” पाणी अडवा पाणी जिरवा” या संकल्पनेमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढून पाण्याचे पुनर्भरण होणार.रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मांदाटणे ग्रामपंचायत येथील पाष्टी गौळवाडी या गावात महाराष्ट्र शासनाच्या *माझी वसुंधरा अभियान* च्या अनुषंगाने गाव विकास समिती पाष्टी यांनी स्वदेस फाउंडेशन व हरित ग्राम संस्था महाड व ग्रामपंचायत मांदाटणे यांच्या मार्गदर्शखाली एकूण २०० गोण्यांचा वापर करत पाष्टी शिवारातील नदीवर वनराई बंधारा बांधला.
या गावापासून वाहणाऱ्या नदीवर सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला.सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती, मुरूम व रेती भरून नदी नाल्यांमध्ये आडवे-उभे रचण्यात आले. पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून येथील स्थानिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. या बंधाऱ्यामुळे ” पाणी अडवा पाणी जिरवा” या संकल्पनेमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढून पाण्याचे पुनर्भरण होणार आहे.याचा फायदा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होणार असून त्यांची भात शेती व इतर पिके वाढीस लाभ मिळणार आहे.
स्वजल स्पर्धेत ग्रामविकास समिती पाष्टी गौळवाडी हे सहभागी झाले असून वनराई बंधारा बांधून उत्तम जलसंधारण केले आहे.यावेळी स्वदेस प्रतिनिधी चांगदेव सानप व गाव विकास समिती अध्यक्ष राजाराम दिवेकर, सचिव राजाराम धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.