जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380
बुलढाणा : – भारताच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच तंबाखु विरोधी, बालविवाह व भृण हत्या प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडू, छायाचित्रकार आणि हर घर सविधान उपक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजारोहण
येथील प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाच्यावतीने प्रजासत्ताक समारंभ आयोजित करण्यात आला होता. विभागीय अधिकारी विपुल राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. पराग नवलकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रमोद पाटील, गजानन घीरके, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड आदी उपस्थित होते.