प्रदूषण अधिकारी प्रदूषणा करीता नागरिकांनाच जवाबदार धरतोय!

88

प्रदूषण अधिकारी प्रदूषणा करीता नागरिकांनाच जवाबदार धरतोय!

प्रदूषण अधिकारी प्रदूषणा करीता नागरिकांनाच जवाबदार धरतोय!
प्रदूषण अधिकारी प्रदूषणा करीता नागरिकांनाच जवाबदार धरतोय!

अदानीच्या सडक्या कचऱ्याच्या जीवघेण्या प्रदूषणावर कारवाई करेल कोण?

🖋️साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घूस : लोकशाहीत गैरकृत्य करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून कायदे निर्माण केले व या कायद्याची अंमल बजावणी व्हावी याकरिता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली
मात्र या अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्या ऐवजी भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे चंद्रपूरातील उप प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जवाबदार अधिकाऱ्याने घुग्घूस शहरातील प्रदूषणाला लॉयड्स मेटल्स कंपनी जवाबदार नसून शहरातील नागरिकच जवाबदार असल्याचा अजब विधान करून आपण सदैव कंपन्याच्या बाजूनेच राहू जनतेने आपलं स्वतः बघावे असे स्पष्ट केले आहे अश्यात एसीसी (अदानी ( कंपनीच्या सडक्या व अंत्यन्त दुर्गंधी युक्त कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषनावर कारवाई करेल कोण? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घूस शहराला प्रदूषणाचा ग्रहण लागलेला आहे लॉयड्स कंपनीच्या प्रदूषणाने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता एसीसी (अदानी ) कंपनीच्या जीवघेण्या सडक्या दुर्गधी युक्त कचऱ्यामुळे आजारी पडावे लागण्याची शक्यता निर्णय झाली आहे?

एसीसी (अदानी )कंपनीतर्फे किलन मध्ये सडक्या व घाणीयुक्त कचरा जाळला जातो या आधी जगभराने घातक केमिकल असल्याचा ठपका ठेवून लहान मुलांचे चिनी खेळण्यावर आप – आपल्या देशात बंदी घातली ते खेळणी एसीसी कंपनीने आपल्या किलन मध्ये जाळून नागरिकांना होणाऱ्या जीवघेण्या आजारात हातभारच लावला होता?

आता वाहनातून कंपनीत जाणारा हा सडका कचरा नागरिकांसाठी जीवघेणी डोकं दुःखी ठरत आहे.
कंपनीत कचरा नेणाऱ्या वाहना मधून पडणाऱ्या कचऱ्यामुळे सर्व रस्त्यावर घाण निर्माण होत असून यावर शासनाने बंदी आणणे आवश्यक आहे.

घुग्घूस शहरा लगत असलेल्या मातारदेवी येथील मुख्य मार्गानी एसीसी ( अदानी ) कंपनीत दररोज घाणीने भरलेले ओव्हरलोड वाहन जात असतांना गावाच्या मुख्य मार्गांवर या वाहना मधील सडलेला कचरा पडतो व सर्व गाव तसेच परिसरात जीवघेणी दुर्गधी पसरते हे नेहमीचेच झालेले आहे.

आज दिनांक 27 जानेवारी रोजी पी. आर. ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रॅक सडलेला कचरा नेत असतांना या वाहनाची तिरफाल फाटून यामधील सडका कचरा मुख्य मार्गांवर पडल्याची माहिती मिळताच गावातील सरपंच संध्या पाटील व ज्येष्ठ नेते संजय टिपले घटनास्थळी धाव घेत सदर वाहन रोखून धरले व कंपनीला याबाबतची माहिती दिली असता कंपनीने जेसीबी मशिन पाठवून सदर कचरा साफ केला.
मात्र गावातून ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी तसेच जडवाहनावर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.