वरळीत 78 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, घरातील नोकर फरार.

95

वरळीत 78 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, घरातील नोकर फरार.

 78-year-old woman strangled to death in Worli

78-year-old woman strangled to death in Worli
दयानंद सावंत

मुंबई:- वरळी सी फेस येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समजते आहे. ही वृद्ध महिला 78 वर्षांची होती. चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल 5 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे ज्या दिवशी वृद्धेची हत्या झाली त्या दिवसापासून घरात काम करणारा नोकरही गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे घरातील नोकरानेच चोरीच्या उद्देशाने वृद्धेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नोकराचा शोध घेण्यात येत आहे.

विषाणी दौलवानी असे मृत वृद्द महिलेचे नाव आहे. विषाणी या मुले आणि नातवंडांसह वरळी सीसी फेस येथील वरळी दूध डेअरी या ठिकाणी एका बंगल्यात राहण्यास होत्या. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास त्यांचा खून झाल्याचे त्यांच्या सून आणि मुलाकडून समजते. रात्री खालच्या खोलीत त्या मृत अवस्थेत सून आणि मुलांना दिसून आल्या. तसेच घरात चोरी झाल्याचे दिसून आले. विषाणी यांच्या कुटुंबीयांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. कुटुंबियांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार घरातील 5 लाखाचा ऐवज चोरीला गेला असून त्याच्याकडे कामाला असणारा नोकर घटना घडली तेव्हापासून फरार आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून नोकरा विरुद्ध हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.