हिंगणघाट भाजी विक्रेत्यांच्या एंटीजन कोरोना तपासणी.

आशीष अंबादे प्रतिनिधी
हिंगणघाट दि. 26 फेब्रुवारी :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भावावरती नियंत्रणासाठी प्रशासनाच्यावतीने अनेक उपाययोजना करण्यात येत असून याच उपाययोजनांचा भाग म्हणून 26 रोजी शहरातील भाजी विक्रेत्यांच्या एंटीजन तपासण्या सुरू करण्यात आल्या.
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता उपविभागीय अधिकारी डॉ. चंद्रभान खंडाईत यांनी आरोग्य विभागाचे सहकार्याने शहरात भाजीविक्रेते तसेच फुटपाथ विक्रेत्यांची कोरोनातपासणी करण्याचे आदेश दिले. आज शहरातील 60 भाजीपाला विक्रेत्यांची त्यांचे परिसरात जावून आरोग्य अधिकार्यांचे मार्गदर्शनाखाली एंटीजन तपासणी करण्यात आली. सुदैवाने एंटीजन तपासणीमधे कुणाचाही अहवाल सकारात्मक नाही. सदर एंटीजन तपासणी मोहीम पुढील 3 मार्चपर्यत सुरूच राहणार आहे.
भाजीविक्रेत्यांनंतर दुसर्या टप्प्यात इतर व्यापार्यांचा तपासणी करताना समावेश राहिल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी कुचेवार यांनी दिली. मोहीम यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी नेमले असून नोडल अधिकारी म्हणून विशाल ब्राम्हणकर या तपासणी मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.