As there was no money for the treatment of the eldest daughter, the mother sold the underage girl for Rs 10,000.
As there was no money for the treatment of the eldest daughter, the mother sold the underage girl for Rs 10,000. As there was no money for the treatment of the eldest daughter, the mother sold the underage girl for Rs 10,000.

मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून आईने पोटच्या अल्पवयीन मुलीला 10 हजारांना विकले.

 As there was no money for the treatment of the eldest daughter, the mother sold the underage girl for Rs 10,000.

As there was no money for the treatment of the eldest daughter, the mother sold the underage girl for Rs 10,000.

✒️प्रतीनिधी✒️
नेल्लोर 27 फेब्रुवारी :- येथे आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला 10 रुपयांत विकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोठ्या मुलीवर उपचार करण्यासाठी आई वडिलांनी त्यांच्या पोटच्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला 46 वर्षांच्या व्यक्तीला 10 हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कुटुंबातील मोठ्या मुलीला श्वासाचा आजार आहे. त्यामुळे त्यांना पैशांची गरज होती, म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय दिला.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर मधील हे प्रकरण आहे. चिन्ना सुब्बैय्या असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्यानं या अल्पवयीन मुलीशी बुधवारी लग्न केले होते. त्यानंतर गुरुवारी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची सुटका केली. आता या मुलीला बाल आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. त्या ठिकाणी तिचं काउन्सिलिंग करण्यात येत आहे.

आरोपी सुबैय्या या परिवाराच्या शेजारी राहतात. त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आहे. त्यामुळे त्यांना दुसरं लग्न करायचं होतं, म्हणून त्यांनी हा सौदा केला. मुलीच्या परिवारानं त्यांच्याकडे सुरुवातीला 25 हजार रुपयांची मागणी केली होती.

आरोपीनं अल्पवयीन मुलीला लग्नानंतर त्याच्या धामपूर जिल्ह्यातील नातेवाईकाकडं नेलं होतं. त्या ठिकाणी त्या मुलीनं रडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या घरातील शेजारच्यांनी मुलीची विचारपूस केली तेंव्हा त्याला हा सर्व प्रकार समजला. शेजारच्यांनी याची माहिती गावातील संरपंचाला दिली. त्यांनी तातडीनं बाल कल्याण विभागाशी संपर्क साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here