जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणी.

54

जळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणी.

आगीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय तज्ञ समिती नेमणार.

 Guardian Minister Vijay Vadettiwar inspects the burnt bamboo training center.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी:- चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेची चौकशी करण्यासाठी आय.ए.एस. अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तांत्रीक बाबींची माहिती असलेल्या तज्ञ सदस्याची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची निर्माणाधीन इमारत काल आगीत जळाल्याने त्याची पाहणी आज पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवडे, चिचपल्ली बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या संचालक के.एम.अभर्णा, वन अधिकारी सुशील मंतावार प्रामुख्याने उपस्थित होते.