हिंगणघाट शहरातील वसंत लॉन तसेच निखाडे सभागृह मंगल कार्यालयावर दंड.

आशीष अंबादे प्रतिनिधी
हिंगणघाट:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भावावरती नियंत्रणासाठी प्रशासनाच्यावतीने अनेक उपाययोजना करण्यात येत असून याच उपाययोजनांचा भाग म्हणून 26 रोजी शहरातील विवाहकार्यप्रसंगी प्रशासनाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या मंगल कार्यालय संचालकास 10 हजार रुपयापर्यंत दंडसुद्धा आकारण्यात आला.
मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी नेमले असून नोडल अधिकारी म्हणून विशाल ब्राम्हणकर या तपासणी मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. पालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाद्वारे आज शहरातील वसंत लॉन तसेच निखाडे सभागृहाच्या मालकांवर 10 हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.