Punitive action against Mars office, hotels and shopkeepers in Rajura.
Punitive action against Mars office, hotels and shopkeepers in Rajura.

राजुरामध्ये मंगल कार्यालय, हॉटेल्स व दुकांदारावर दंडात्मक कारवाई.

महसूल-पोलीस-नगरपरिषद यांची संयुक्त कारवाई; नियमांचे पालन करण्याचे आव्हान

Punitive action against Mars office, hotels and shopkeepers in Rajura.
Punitive action against Mars office, hotels and shopkeepers in Rajura.

✒संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी✒

राजुरा,दि. 26 फेब्रुवारी:- राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार कोरोना विषाणू (कोविड -19) चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोणातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशानुसार तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यात कोरोना विषाणु (कोविड -19) च्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सर्वांनी मास्क व सामाजिक अंतर पाळून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले असताना मात्र आज महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासन यांच्या संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत राजुरामध्ये शहरातील मंगल कार्यालय, दुकाने, हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई कारवाही करण्यात आली.

राजुरा तालुक्यातील कोरोना विषाणू (कोविड -19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , वाढत्या कोरोना विषाणू (कोविड -19) चा प्रादुर्भावाचा आळा घालण्याकरिता महसुल प्रशासन , पोलीस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासन यांच्या वतीने संयुक्तरित्या राजुरा शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी विना मास्क फिरणा-या नागरिकांवर, दुकानामधील विना मास्क व सामाजिक अंतर न पाळणा-या दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच लग्न समारंभास इत्यादी कार्यक्रमांना घालून दिलेल्या अर्टीचे उल्लंघन करणा-या तीन मंगल कार्यालय, सभागृह यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे एकूण पंधरा हजार दंड आकारण्यात आला. मास्क न वापरणा-या 29 व्यक्तीवर 11 हजार आठशे दंड आकारण्यात आले . तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणा-या तीन दुकानांवर प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळी तहसीलदार हरीश गाडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादुरे, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, अतिम बनसोडे, डॉ. विनोद डोनगांवकर, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी दिपक गोहणे, सुनील रामटेके, मारोती अत्रे, विनोद खोब्रागडे, प्रकाश चेन्नुरवार, नगर पालिका प्रशासकिय अधिकारी रवी जांभुळकर आदी उपस्थित होते . सोबतच प्रशासनातर्फे मोफत मास्क वाटप करण्यात आले व तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यात कोरोना विषाणु च्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सर्वांनी मास्क व सामाजिक अंतर पाळून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले . तसेच यापुढे कोरोना संदर्भात घालून दिलेले निर्देशाचे उल्लंघन झाल्यास तालुका प्रशासनातर्फे कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here