Sindhudurg District Surgeon Dr. Allegation of molestation against Shrimant Chavan, pre-arrest bail granted.
Sindhudurg District Surgeon Dr. Allegation of molestation against Shrimant Chavan, pre-arrest bail granted.

सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप, अटकपूर्व जामीन मंजूर.

Sindhudurg District Surgeon Dr. Allegation of molestation against Shrimant Chavan, pre-arrest bail granted.
Sindhudurg District Surgeon Dr. Allegation of molestation against Shrimant Chavan, pre-arrest bail granted.

✒सिंधुदुर्ग जिल्हा प्रतीनिधी✒
सिंधुदुर्ग,27 फेब्रुवारी: जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. 354 कलमांतर्गत ओरोस पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयातील एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय होता. मागील 2 महिन्यांपासून डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत नमूद केलं होते.

सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची ओपीडीसमोर केबिन आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या केबिनच्या बाहेरील बाजूला महिला सुरक्षा तैनात असतात. ही कंत्राटी महिलाही तिकडेच कर्तव्याला असायची. श्रीमंत चव्हाण वारंवार त्या महिलेला कॅबिनमध्ये बोलावून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. श्रीमंत चव्हाण यांनी सुमारे आज सायंकाळी 4.00 वाजता बेल मारून त्या कंत्राटी महिलेला कॅबिनमध्ये बोलावले. त्यानंतर जवळ बोलावून तिचा हात हातात घेऊन तू मला आवडतेस, मी जे काही वागतो ते कोणाला सांगू नकोस, असे ते डॉक्टर त्या महिलेला सांगू लागले. तसेच माझी तक्रार केल्यास तुला नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी त्या डॉक्टरांनी महिलेला दिल्याची महिलेनं तक्रारीत म्हटलं होते. डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे अश्लील चाळे आणि छळाला कंटाळून अखेर त्या महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय होता. 

डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अखेर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर.

सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना अखेर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. जिल्हा सत्र न्यायाधीश ​2 यांनी हा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. फिर्यादी महिलेने विनयभंगच्या केलेल्या तक्रारीत ज्या दिवसांचा आणि तारखेचा उल्लेख केला त्या दिवशी डॉ.चव्हाण हे रीतसर सुट्टी घेऊन स्वतःचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देऊन गेले होते आणि परभणी येथे न्यायालयात एका केस साठी हजर राहिले होते.त्या बातचित कागदपत्रे त्यांनी सादर केली आहे. जिल्हा न्यायालयात डॉक्टर चव्हाण यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती आर​.​ बी​.​ रोटे यांनी ६ मार्चपर्यंत डॉ​.​ चव्हाण यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here