अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई केंव्हा मिळणार -प्रहारची निवेदनातून मागणी.

51

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई केंव्हा मिळणार –प्रहारची निवेदनातून मागणी.

 When will the farmers affected by heavy rains get compensation?

आशिष अंबादे प्रतीनीधी
वर्धा :- जिल्हातील कारंजा(घाडगे) क्षेत्रातील सन 2020-21 या कालावधित मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतमालाचे नुकसान झाले होते. सोयाबीन, कापूस, फळबाग इत्यादी पिकांचे शासना तर्फे सर्वेक्षण करण्यात आले, परंतु आजपर्यंत नुकसान भरपाई मिळलेली नाही.शेतीत झालेल्या नुसकाणीची भरपाई त्वरीत देण्यात यावी अशी मागणी तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तहसिलदार सचिन कुमावत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

सन 2020-21 मध्ये झालेल्या अतिवृष्टिमुळे या वर्षीचे सोयाबीनचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना त्यांनी पेरलेले सोयाबीनचा एक दाणा पण घरी नेता आला नाही. पूर्ण सोयाबीन हे सडून गेले होते. शासन प्रशासन मार्फत नुकसान भरपाईच्या घोषणा करण्यात आल्या मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खिशात मात्र एक दमडीही पडलेली नाही. शेतकरी मात्र शासनाच्या कारवाईकडे डोळे लाऊन वाट पाहत आहे. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेतकऱ्याला अशा कठीण प्रसंगी मदत करणे त्याला या संकटातून बाहेर काढणे ही शासनाची सोबतच प्रशासनाची जबाबदारी असते मात्र आज शेतकरी संकटात आहे तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही.
 
प्रशासकीय स्तरावर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे येत्या काही दिवसात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असे प्रहार संघटनेतर्फे इशारा देण्यात आला. प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अक्षय भोने. प्रतीक वाहने, शैलेश दिग्रसे, गजू खवशी यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले