जोगेश्वरीत मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन
पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी :- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजरा करण्यात येणार्या ‘मराठी राजभाषा दिन’ निमित्त जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मि.श्री. रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यावेळी पालखितील ग्रंथाचे पुजन करण्यात आले.
या ग्रंथ दिंडीत विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिल संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभाग संघटक प्रियंका आंबोळकर, उपविभागप्रमुख समन्वयक महेश गवाणकर, उत्तरा नायर, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, मंदार मोरे, नंदकुमार ताम्हणकर, सुचित्रा चव्हाण, उदय हेगिस्टे, महेश पडवळ, व्यापार विभागाचे अनिरुद्ध नारकर, श्रमिक शाळेचे विद्यार्थी, आदि पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भव्य अशी रांगोळी इच्छापुर्ती गणेश मंदिर येथे काढण्यात आली होते.