एमएसएमई डिफेन्स एक्सपो-2024 पुणे येथे संपन्न
जिल्ह्यातून सरंक्षण क्षेत्रातील उत्पादने संबंधीत पाच उद्येाग घटकांचा प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभाग
✍️नितेश पुरारकर ✍️
लोणेरे गोरेगाव विभाग
📞 70211 58460📞
माणगांव :- उद्योग विभागाचा महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो-2024 दि.24 ते 26 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत “पुणे इंटरनॅशनल एक्सीबीशन अँड कन्हेंशन सेंटर,मोशी, पुणे येथे संपन्न झाला. यामध्ये जिल्ह्यातून सरंक्षण क्षेत्रातील उत्पादने संबंधीत पाच उद्येाग घटकांनी प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभाग घेतला असल्याची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे.
या एक्सपोमध्ये भारतीय संरक्षण दलातील सर्व विभाग, संरक्षण उत्पादनासंबंधी सर्व सार्वजनिक उपक्रम,DRDO इत्यादी विभाग /संस्था यांनी आपला सहभाग नोंदवला. एक्सपो मध्ये राज्यातील नामांकित मोठे उद्योग व जवळपास 400 सुक्ष्म,लघु व मध्यम उपक्रमांनी त्यांची उत्पादने व तांत्रिक कार्यक्षमता प्रदर्शित केली. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारीत स्वदेशी उत्पादन/ पुरवठा,अत्याधुनिक तंत्रज्ञान, देवाण-घेवाण व पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी राज्यातील नवउद्योजक, स्टार्टअप, औद्येागिक समुह व सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम यांना सदर प्रदर्शन महत्वपूर्ण ठरले आहे.या प्रदर्शनात उद्योग विभागाने महाराष्ट्र पॅव्हेलियन उभारले होते. पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री, महाराष्ट्र लघु उद्येाग विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग मंडळ इत्यादीचे अद्यावत उपक्रम उद्योग धोरणे इत्यादीबाबतची माहिती अभ्यांगतांना देण्यात आली अशा प्रकारे उद्योगांच्या विकासासाठी अभ्यांगतांना एक चांगली संधी उपलब्ध झाली.डिफेन्स एक्सपो कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे,, विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
प्रदर्शनात सरंक्षण क्षेत्रातील स्थल सेना, नौदल सेना व वायु सेना या विभागांच्या सरंक्षण क्षेत्रातील उत्पादनाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सुक्ष्म्, लघु व मध्यम उपक्रमातील संरक्षण क्षेत्रातील उत्पादन उद्योगांचा प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातून सरंक्षण क्षेत्रातील उत्पादने संबंधीत पाच उद्येाग घटकांनी प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. यामध्ये मे. टाटा स्टील, खालापूर, मे.सुनिल र्फोजिंग ॲण्ड स्टील इंडस्ट्रीज, एमआयडी, तळोजा, मे.जयश्री गलवा स्टील प्रा. लि., एमआयडीसी तळोजा, मे.आहिल प्रोडक्ट कंपनी प्रा.लि., खालापूर तसेच मे.ॲम्प्ट्रॉनिक्स टेक्नो प्रा.लि.आर्कोस इंङ खालापूर हे उद्योग आपल्या उत्पादनासह सहभागी झाले होते.रायगड जिल्हयातील सरंक्षण क्षेत्र संबंधी उत्पादनाचा सरंक्षण क्षेत्रातील खरेदीदारांना संपर्क साधण्यासाठी व सरंक्षण तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उद्योगाचा प्रदर्शनात सहभागाकरीता उद्योग विभागाच्या श्रीमती. विजु सिरसाठ, उद्योग सह संचालक, कोकण विभाग ठाणे व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग जी.एस. हरळय्या तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी/ कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.