शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन  प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना लाखोंचे बक्षिस

शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन 

प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना लाखोंचे बक्षिस

शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन  प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना लाखोंचे बक्षिस

✒️ देवेंद्र भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

अमरावती, दि. 27 : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक , विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन होणार असून अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना गुणांकन देऊन विजेता घोषित करण्यात येईल. विजेता ठरलेल्या शाळांना लाखोंचे बक्षीस वितरण करण्यात येईल. अमरावती विभागातील अधिकाधिक शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान, मोठी बांधकामे या बाबींकडे लक्ष केंद्रीत होते. आता या अभियानाच्या कक्षा रुंदावण्यात आल्या असून अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याचा दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अनेकविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शाळेचा सर्वांगिण विकास होण्यासाठी उपरोक्त महत्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित सर्व शाळांना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

उपरोक्त घटकांची परिणामकारकरित्या अंमलबजावणी होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा आयोजित करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर स्पर्धांचे आयोजन होणार असून प्रत्येक स्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस संबंधित विजेता शाळांना प्रदान करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विजेत्या होणाऱ्या शाळांना तालुकास्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 3 लक्ष रुपये, 2 लक्ष रुपये, 1 लक्ष रुपये, जिल्हास्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 11 लक्ष, 5 लक्ष, 3 लक्ष, विभागस्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 21 लक्ष, 11 लक्ष, 7 लक्ष तर राज्यस्तरावर विजेत्या ठरणाऱ्या शाळांना पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 51 लक्ष, 21 लक्ष, 11 लक्ष रुपये बक्षिसांचे वितरण केल्या जाईल.

शासकीय व स्थानिक स्वराज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या अभियानाची बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा याप्रमाणे व्याप्ती राहील. अ गटात विद्यार्थी केंद्रीत उपक्रम व सहभाग (60 गुण) व ब गटात शाळेव्दारे आयोजित उपक्रम (40 गुण) याप्रमाणे अभियानाचे स्वरुप राहील. या अभियानात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here