अखेर जखमी बिबट्या जेरबंद
✍🏻अजय कुकुडकर ✍🏻
गडचिरोली शहर प्रतिनिधी
मो 95454 91059
गडचिरोली :- काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा गावातील शेताजवळील पुला खाली जखमी बिबट बसून असल्याची माहिती मिळताच वनविभाग व आर आर टी पथक गडचिरोली यांनी घटनास्थळी धाव घेतली व मादी बिबट्याला जेर बंद करून नागपूर गोरेवाडा वन्यजीव उपचार केंद्र येथे पाठवण्यात आले सदर बिबटचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे आहे.
नियत क्षेत्र चोप अंतर्गत येत असलेल्या डोंगरमेंडा कक्ष क्रमांक 902 मधील जंगलात बिबट जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक वडसा व उपविभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदशानात वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास धोंडने यांच्या नेतृत्वात जखमी बिबट्याला जेरबंद करण्याकरिता गडचिरोली येथील जलद बचाव दल पथकाला बोलविण्यात आले बिबट्याला मोठ्या शिफायतीने जेरबंद केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव ) डॉ. मृणाल टोंगे यांनी मादी बिबट्यावर प्रथम उपचार केला. व पुढील उपचाराकरिता गोरेवाडा येथील वन्यजीव उपचार केंद्र येथे पाठविण्याचा सल्ला दिला. संपूर्ण कार्यवाही करिता आर आर टी गडचिरोलीचे अजय कुकडकर, कुणाल निमगडे, मकसूद सय्यद, निखिल बारसागडे, पंकज फरकाडे, गुणवंत बाबनवाडे व वन कर्मचारी, वनमजूर यांनी सहकार्य केले.