ममतांनी घेतली संजय राऊत, पवारांची भेट

49

नवी दिल्ली – आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना केंद्रातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज देशातील विविध प्रादेशिक पक्षातील नेत्यांच्या दिल्लीत भेटी घेतल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी यांनी आज शिवसेना, तेलुगु देसम पार्टी, राष्ट्रवादी, वायआरएस काँग्रेस पक्षांतील नेत्यांच्या भेटी घेत त्यांच्यासोबत गुप्तगू केलं. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. शरद पवार यांना भेटण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः पवारांच्या ऑफिसमध्ये गेल्या. ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या भेटीचं वृत्त आधी शरद पवारांनी फेटाळलं होतं, परंतु, त्यानंतर मात्र भेट झाल्याचं कबुल केलं.