मुंबईच्या भांडूप मधील रुग्णालयात भीषण 10 मृत्यू.

91

मुंबईच्या भांडूप मधील रुग्णालयात भीषण 10 मृत्यू.

मुंबईच्या भांडूप मधील रुग्णालयात भीषण 10 मृत्यू.
मुंबईच्या भांडूप मधील रुग्णालयात भीषण 10 मृत्यू.

✒️नीलम खरात प्रतिनिधी✒️
मुंबई:- येथील भांडूप परीसरातील ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असल्याचे समोर आले आहे. ही आग इतकी भिषण होती की, आगीवर नियंत्रक मीळवण्यासाठी तबल 11 तास लागले. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण या आगीत जखमी झाले आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानाच्या अर्थक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

भांडूपमधील ड्रीम मॉल येथे असलेल्या सनराईज रुग्णालयाला काल भीषण आग लागली होती. पाहता पाहता आगीने विक्राल रुप धारण केले होते. या सनराईज रुग्णांलयात मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरसने बांधीत रुग्ण उपचारासाठी दाखल होते. 76 कोरोना वायरस बांधीत रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती सर्मोर येत आहे. त्यात 10 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

भांडुप येथील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तसेच, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते आणि पाहणी केली.

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.