तोंडला मास्क लावले नाही म्हणून विचारणा केली, चक्क अधिकाऱ्याला 2 तरुणांनी केली मारहाण.
तोंडला मास्क लावले नाही म्हणून विचारणा केली, चक्क अधिकाऱ्याला 2 तरुणांनी केली मारहाण.

तोंडला मास्क लावले नाही म्हणून विचारणा केली, चक्क अधिकाऱ्याला 2 तरुणांनी केली मारहाण.

Asked not to wear a face mask, Chukka officer was beaten by 2 youths.
तोंडला मास्क लावले नाही म्हणून विचारणा केली, चक्क अधिकाऱ्याला 2 तरुणांनी केली मारहाण.

✒आशीष अंबादे प्रतिनिधि✒
वर्धा,दि.25 मार्च:- वर्धा जिल्हातील आर्वीतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 2 तरुणांनी चक्क आर्वी येथील उपविभागीय अधीकारी यांना मारहाण केली असल्याचे समोर आले आहे.

आज वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरसचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्हात कडक नियम आणि संचारबंदी लावली आहे. त्यामुळे तोंडला मास्क लावुन घरा बाहेर जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी काल आर्वी येथील उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक हे रस्तावर निघाले होते. तेव्हा त्यांना आर्वीच्या शिवाजी चौकात 2 तरुण वीणा मास्क लावलेले दिसले, मास्क का लावले नाही, अशी विचारणा केली. त्यांना मास्क लावण्यासाठी सांगितले उपविभागीय अधिकारी धार्मिक यांना त्यां तरुणांनी मास्क लावण्यास नकार देऊन अरेवारी सुरू केली. आणि उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना युवकांनी मारहाण केली. या प्रकरणी सोयल नूर हसन शेख वय 17 वर्ष आणि आवेश खान जाबिर खान पठाण वय 21 वर्ष रा. पिंपरी पुनर्वसन या दोन युवकांना पोलिसानी अटक केली आहे.

वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्हात कोरोना वायरसचा प्रक्रोप वाढत असल्याने वर्धा जिल्हात कडक निर्बंध लावले आहे. विनामास्क
घराबाहेर निघणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाची अंमलबजावणी आर्वी येथील उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक हे मंगळवारी दुपारच्या सुमारास करीत असताना शेख आणि पठाण हे दोघे विनामास्क दिसून आले. त्यावेळी ही घटना घडली.

भर चौकात उपविभागीय अधिकारी यांना मारहाण सुरु असतांना. घटनास्थयी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. हे पाहताच मारहाण करणारे पलायन करण्याच्या प्रयत्नात होते, पण, उपविभागीय अधिकारी धार्मिक यांनी एकाला पकडून ठेवले. पोलिसांनी माहिती देताच सदर मारहाण करणारा युवकांना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here