गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना

57

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना.

Pension scheme for meritorious players
गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना.

✒️मनोज खोब्रागडे✒️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 26 मार्च:- क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत भारत सरकार युवा आणि क्रिडा मंत्रालययांचे दि. 7 जुन 2018 रोजीच्या परिपत्रकनुसार गुणवंत खेळाडु करीता क्रिडा पेन्शनसाठी सुरक्षा पुर्ववत करणे सक्रीय क्रिडा करियरमधुन अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना केंद्र शासन राबवित आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतु आहे.

सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्यांने ऑलम्पिक ऑलम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्डकप (ऑलम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेतील समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त गुणवंत खेळाडू़स मासिक मानधन देण्याची तरतुद करण्यात आली आहे. अशी पेन्शन लागु करताना खेळाडु सक्रिय क्रिडा करियरमधुन निवृत्त झाले असावे.

पेन्शन प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित पात्र खेळांडुनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला प्रस्ताव केद्र शासनास सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती जिल्हा क्रिडा कार्यालय तसेच https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons या लिंकवर उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्हयातील जास्तीत जास्त खेळांडुनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले आहे.