अ‍ॅट्रॉसिटी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी, विविध सामाजिक संघटने तर्फे निवेदन.
अ‍ॅट्रॉसिटी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी, विविध सामाजिक संघटने तर्फे निवेदन.

अ‍ॅट्रॉसिटी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी, विविध सामाजिक संघटने तर्फे निवेदन.

अ‍ॅट्रॉसिटी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी, विविध सामाजिक संघटने तर्फे निवेदन.
अ‍ॅट्रॉसिटी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी, विविध सामाजिक संघटने तर्फे निवेदन.

✒साहिल महाजन प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.26 मार्च:- यवतमाळ जिल्हात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती-जमाती वर अन्याय अत्याचार वाढत असल्याचं समोर येत आहे. यवतमाळ जिल्हातील पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गतची आदिवासी समाजावरील अत्याचार प्रकरणी चौकशीच्या नावावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दडपण्याचा व गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याच्या घटना वाढत आहेत. पोलीस पदाचा गैरवापर करून आरोपींना अशा घटना घडविण्यास प्रोत्साहन देणार्‍या प्रकरणी त्वरित गुन्हे दाखल करून अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणारे निवेदन आज उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांना देण्यात आले आहे.

आदिवासी समाजाच्या संरक्षणार्थ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस अधिकारी कडक व तत्परतेने कारवाई करण्याचे कर्तव्य पार पाडीत नसल्याचा आरोप निवेदनातूूून नकरण्यात आला. पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊनही आर्थिक लाभ, राजकीय दबाव व जाणीवपूर्वक आदिवासी समाजाच्या अन्याय अत्याचाराच्या घटना तक्रारी चौकशीच्या नावावर दडपुन ठेवणे, गुन्ह्याची तीव्रता व आरोपीची संख्या कमी करून त्यांना त्वरित अटक न करणे, पीडिताला संरक्षण न देणे, तक्रारदारा सोबत असभ्य वर्तन, आरोपी पक्षाला बोलावून काउंटर रिपोर्टसाठी प्रोत्साहन देणे, पीडित फिर्यादी पक्षाला आपसी समेटसाठी दबाव आणणे, पीडित पक्षात सुरक्षिततेची भावना निर्माण न करणे आदी कारणांमुळे अनुसूचित जमाती वरील अत्याचाराचा आलेख वाढत आहे. यामुळे समाजातील अनेक कुटुंबाकडून जमिनी, घरे, शेती व आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासा सोबतच बेअब्रू करणार्‍या घटना पुसद उपविभागासह यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाढत आहे त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कडक व तत्परतेने अंमलबजावणी व्हावी व जिल्हाधिकारी यांनी दक्षता समितीची सभा लावावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी आदिवासी समाजाच्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी भागोराव भिसे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे अध्यक्ष गणपत गव्हाळे, आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी व नारायण कर्‍हाळे, सुरेश धनवे, हरिदास बोके, पांडुरंग व्यवहारे, ज्ञानेश्वर तडसे, सिताराम पट्टेबहादूर, पंडित ढगे, गौतम पट्टेबहादूर, भास्कर मुकाडे, नामदेवराव इंगळे, राजेश ढगे, सुनील ढोले, संतोष गारोळे यांनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here