डोळ्यातले आभाळ तुझ्या

52

डोळ्यातले आभाळ तुझ्या

डोळ्यातले आभाळ तुझ्या

✍कवि राहुल ठाकरे

डोळ्यातले आभाळ तुझ्या
मनामध्ये कोरल्या गेले
पापणीतील ओलाव्याने
चिंब भिजून न्हाऊन गेले

डोळ्यातले आभाळ तुझ्या
गर्जंत असते कानात
साद प्रितीची मागत असते
फिरत असते मार्गात

डोळ्यातले आभाळ तुझ्या
हसत असते पाहिल्यावर
अबोल असते प्रत्येकवेळी
मि त्याचाशी बोलल्यावर

बोलके तुझे डोळे
बोलकी तु छान आहे
तुझ्या ह्या बोलण्यातच
वाटते मला छान आहे

डोळ्यातले आभाळ तुझ्या
जसें आहेस तसेच ठेव
वाहवू नको देऊ आसवांगत
विरह थोडा बाजूला ठेव

लाभत नाही प्रत्येकाला
सैन्दर्यं हे डोळ्यांचे
करत नाही काहीच तरी
तुकडे करतात काळजाचे…