दैनिक नवराष्ट्र सरपंच आदर्श पुरस्कार मतदारांना अर्पित-सरपंच सोमनाथ ओझर्डे
✍ *किशोर किर्वे*✍
*महाड तालुका प्रतिनिधी*
*मो.९५०३०००९५९*
महाड(रायगड):-दि.२६ मार्च २०२२ रोजी दैनिक नवराष्ट्र आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा पीएनपी सभागृह अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सोमनाथ ओझर्डे यांना सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व दैनिक नवराष्ट्रची टिम उपस्थित होती.
सरपंच सोमनाथ ओझर्डे म्हणाले की पुरस्कार माझा नसून ग्रामपंचायत मधील मतदारांचा आहे कारण त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास ज्यामुळे मी सरपंच झालो त्याचीच पोचपावती म्हणून मिळालेला पुरस्कार असून अशाच प्रकारे तालुक्यातील विकसित ग्रामपंचायत म्हणून शिरगाव ग्रामपंचायतीचे नाव असेल अशा प्रकारचा विकास करणार असल्याचे सांगितले व सर्व ग्रामस्थ, दैनिक नवराष्ट्र चे आभार मानले.