नांदेड लेंडी प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती; अशोकराव चव्हाण

नांदेड लेंडी प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती; अशोकराव चव्हाण

नांदेड लेंडी प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती; अशोकराव चव्हाण

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या लेंडी या आंतरराज्य सिंचन प्रकल्पाच्या कामास आता गती प्राप्त होणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथील प्रकल्प बाधित कुटूंबियांसाठी स्वेच्छा पुनर्वसन योजना शासनाने मान्य केली आहे. यासाठी ७७ कोटी रूपयाची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून १९८६ मध्ये या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. दरम्यानच्या काळात सद्यस्थितीत या धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र घळभरणीचे काम शिल्लक आहे. या प्रकल्पाच्या संयुक्त कालव्याची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. तेलंगणा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या या धरणाच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. सदरील प्रकल्पातील बाधित असलेल्या १२ पैकी ११ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न जवळजवळ मार्गी लागला असून मुक्रमाबाद येथील गावठाणा करता एकत्रितपणे एकाच ठिकाणी जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे स्वेच्छा पुनर्वसनाच्या पर्यायाद्वारे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरु होता.