नांदेड जिल्हा कोरोना मुक्तीपासुन पाच पावले दूर आहे
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
नांदेड : नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर दोन महिन्यापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत होती. परंतू मागील काही दिवसांपासून जिल्हा आरोग्य यंत्रणेनी कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीपासून अगदी पाच पावलेच दूर आहे.
शनिवारी (ता.२६) प्राप्त झालेल्या ६६८ अहवालापैकी सर्वाच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकुण संख्या एक लाख दोन हजार ७९७ वर स्थिर आहे.
शनिवारी नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरणातील एक रुग्ण कोरोना आजारातून बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात एक लाख शंभर रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे मागील अनेक दिवसापासून बाधित रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यूची संख्या दोन हजार ६९२ वर स्थिर आहे. सध्या केवळ पाच बाधितांवर उपचार सुरु असून, यातील सर्वांच्याच प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासारखी परिस्थिती आहे.
नांदेड कोरोना मीटर
एकुण बाधित – एक लाख दोन हजार ७९७
एकूण बरे – एक लाख १००
एकुण मृत्यू – दोन हजार ६९२
शनिवारी बाधित – शुन्य
शनिवारी बरे – एक
शनिवारी मृत्यू – शुन्य उपचार सुरु – पाच