नांदेड मालेगावात १० एक्कर ऊस जळाला
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
मालेगाव : -मालेगाव येथे विजेचा प्रवाह कमी ज्यास्त झाल्या मुळे स्पार्कींग होऊन मळणी यंत्रा सह ८ एकर ऊस व दोन एकर गहु जळु खाक झाला आहे सदर घटणा रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.
मालेगाव येथील शेतकरी सुभाशिष कामेवार यांच्या शेतात गहु मळणी सुरू असताना विजेचा प्रवाह कमी ज्यास्त झाल्या मुळे स्पार्कींग होऊन मळणी यंत्रा सह २ एक्कर गहु व गव्हा शेता शेजारी रमेश कामेवार, चंद्रकांत कामेवार यांचा ८ एक्कर ऊस जळुन खाक झाला आहे.
सातत्ताने महावितरण कमी दाबाचा विद्युत पुरवठा करते तसेच वषार्नो वर्ष रोहीत्रा पासुन शेतकर्याचा खांबा पर्यंत विद्युत वाहक तारा तुटलेल्या अवस्थेत आहेत त्याची दुरूस्ती महावितरण करत नाही परंतू विज बिल भरण्यासाठी मात्र महावितरण शेतकर्याना तगादा लावते. महावितरण चा देखबाल दुरुस्ती वेळेवर केल्या मुळे त्या मुळे नुकसान झाले आहे. महावितरण ने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सुभाशिष कामेवार यांनी केली आहे.तलाठी पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. पुढील प्रस्ताव महावितरण कडे पाठवनार असल्याचे
सांगितले.