रिपब्लिकन पक्ष खोरिपा मुंबई प्रदेशच्या वतीने विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर

68

येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी पदाधिकारी यांना तयार राहण्याचे आवाहन

 

मीडिया वार्ता न्युज
२७ मार्च, मुंबई: रिपब्लिकन पक्ष खोरिपाच्या मुंबई येथील कार्यालयात रावबहादूर एन शिवराज भवन, आझाद मैदान मुंबई येथे मुंबई प्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील वार्ड क्रं १४३ च्या अध्यक्ष पदी मोहम्मद सुलतान खान यांची,१४३ महिला अध्यक्ष पदी सानिया अब्दुल्ला खान यांची १४४ महिला अध्यक्ष पदी परवीन पठाण यांची, नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ठाणे महापालिकेच्या मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३२ अध्यक्ष पदी सय्यद आलम इस्माईल यांची, प्रभाग क्रमांक ३३ अध्यक्ष पदी अस्लम अली हुसेन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पक्ष खोरिपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी भाऊ निरभवणे यांनी येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन केले व निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुंबई प्रदेश संघटक सलीम सय्यद, छत्रपती शिवाजी महाराज नगर मानखुर्द तालुका अध्यक्ष अय्याज शेख, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार व मुंबई प्रदेशचे पदाधिकारी सलीम खतीब यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

इतर लोकप्रिय लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ⬇⬇⬇