नागपुर-गोदिया समृद्धी महामार्ग मुळे प्रकल्पग्रस्त शेक-याचे उपविभागिय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558
गोंदिया -तिरोडा –
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतिने नुकतेच नागपुर -गोदिया समृद्धी महामार्गची घोषणा करण्यात आली. यामध्ये मध्ये मौजा धादरी-उमरी येथील कास्तकारी शेतजमिन जाणारे सर्व पीड़ित शेतक-यानी समृध्दी महामार्ग मध्ये मौजा धादरी-उमरी येथील कास्तकारी शेतजमीनीत जाणा-या शेतक-यांच्या मागण्याचे निवेदन डाॅ दिनदयाल पटले याच्या नेतृत्वात उपविभागिय अधिकारी, तिरोडा यांना देण्यात आले.
नागपुर ते गोंदिया द्रुतगती समृध्दी महामार्ग तयार होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मौजा धादरी-उमरी येथील शेतक-यांना भुमीहीन होण्याची पाळी येणार आहे या प्रमाणे तिरोडा तालुक्यातील अनेक गावातील शेतक-याची जमीन समुध्दी महामार्ग मध्ये जात आहे. मौजा-धादरी/उमरी येथील शेतक-यांनी विविध मागण्या निवेदन उपविभागीय अधीकारी तिरोडा यांना दिले. निवेदनात प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतक-याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतक-याच्या कुटुंबातील एका सदस्याला शिक्षण योग्यतेनुसार शासकीय नौकरीमध्ये समावेश करण्यात यावे.गोंदिया नागपुर समृध्दी महामार्ग लगत शेतक-यांच्या/गावक-यांच्या उपयोगाकरीता दुतर्फा सर्विस रोड देण्यात यावे. शेतजमिन अधिग्रहन करतांनी सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेउन आजच्या नविन खरेदी किंमतीच्या पाच पट रक्कम देण्यात यावी.वरील महामार्गात जे प्रकल्पग्रस्त शेतकरी भुमीहीन होत आहेत त्यांना शेती करण्याकरीता शासकीय जमिन उपलब्ध करून देण्यात यावी.
सर्व मागण्यांचा विचारपूर्वक निर्वाहन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ.दिनदयालजी पटले, सुखदासजी अनकर, भाऊलालजी पटले, इंजि. कुमुद पटले, मोरेश्वर अनकर, गौरव झरारिया, शरद भौत्तिक, अनिल अनकर, सतीश पटले सह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.मागण्या शासनाने पुर्ण करावे. अन्यथा सर्व प्रकल्पग्रस्त शेतक-यांकडुन भविष्यात आंदोलन करण्यात येईल सदर निवेदनात देण्यात आला आहे