भंडारा -गोंदिया लोकसभे साठी महाविकास आघाडी तर्फे डॉ. प्रशांत पडोळे यांनी भरला उमेदवारी अर्ज.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना भाऊ पटोले, सतीश चतुर्वेदि, आणि अन्य काँग्रेस चे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्तिथीत.
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
मो.9834486558
भंडारा – महाराष्ट्र प्रथम चारणात होत असलेल्या लोक सभा निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना महाविकास आघाडी आणि महायुती च्या उमेदवारांनी आज दिनांक 27/3/2024 ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षा चे अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले, काँग्रेस चे नेते सतीश चतुर्वेदि आणि अन्य काँग्रेस च्या नेत्या सोबत डॉ. प्रशांत पडोळे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज निवडणूक अधिकारी यांना सोपवीला. या प्रसंगी जलाराम हॉल भंडारा इथे सर्व काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचे नेते मंडळी उपस्तित होते, जलाराम हॉल भंडारा इथून रॅली चे आयोजन करण्यात आले असताना हजारो च्या संख्येने महिला, व, पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, काँग्रेस पक्ष जिंदाबाद, नानाभाऊ आगेबडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत कार्यकर्ते डॉ. प्रशांत पडोळे यांचा उमेदवारी अर्ज देण्यास जात असताना पहावयास मिळाले..