माणगांव दिघी महामार्गावर मौजे नळेफोडी जवळ कार चा अपघात….

माणगांव दिघी महामार्गावर मौजे नळेफोडी जवळ कार चा अपघात....

माणगांव दिघी महामार्गावर मौजे नळेफोडी जवळ कार चा अपघात….

माणगांव दिघी महामार्गावर मौजे नळेफोडी जवळ कार चा अपघात....

✍️ नंदकुमार चांदोरकर✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगाव :- दि.२५ मार्च रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास चांदोरेग्रामपंचायत हद्दीत मौजे नळेफोडी गावाजवळ माणगांव ते म्हसळा रोडवर फिर्यादी अब्दुलकेष अजहर आलम वय वर्ष ४४ रा. नवेनगर ता. म्हसळा संध्या राहणार नवनाथ नगर पनवेल हे माणगांव बाजूकडून म्हसळा बाजूकडे जात असताना समोरून येणारी होंडा कार क्र.एम्.ऐचं.१४ के.डब्लू १४६४ म्हसळा बाजूकडून माणगाव बाजूकडे येत असताना त्याने त्याच्या ताब्यातील कार हि अती वेगाने बेकायदेशीरपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोर माणगाव बाजूकडून म्हसळा बाजूकडे जाणाऱ्या इंज्याय १.४ एल.टी. सेव्हन सिटर बी.एस.वाय.व्ही गाडी क्र.एम.एच.०४ जी.इ ६४५२ या गाडीस समोरून ठोकर मारून अपघात करून त्या अपघातात जखमी अमीर अजमेर आलम शेख वय ३८ रा.म्हसळा जखमीस उजवे हात व उजवे पाय फ्याक्चर झाले असून गालावर व हातावर गंभीर दुखापत झाली आहे, सदर अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.सदर घटनेचा तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोजकर साहेब व मपोह ओमले हे करीत आहेत.