शेतक-यांनी एकात्मीक पिक पद्धतीचा वापर करावा डॉ. अनिल कोल्हे

शेतक-यांनी एकात्मीक पिक पद्धतीचा वापर करावा डॉ. अनिल कोल्हे
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही : विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही तर्फे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा प्रगतशील शेतकरी विलासजी बनकर, पळसगाव (जाट) ता. सिंदेवाही यांच्या शेतावर आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन हेमंत शेंदरे, अध्यक्ष शेतकरी शास्त्रज्ञ मंच, सिंदेवाही तर विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही हे होते. तसेच मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. सोनाली लोखंडे व सहाय्यक प्राध्यापक, डॉ. नरेश कापसे, आशिष नागदेवे, संशोधन सहयोगी (ग्राकृमौसे) तसेच किशोर हटवादे, अशोक तुम्मे व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे प्रगतशील शेतकरी सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सर्वप्रथम डॉ. अनिल कोल्हे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा शेतक-यांच्या शेतावर आयोजीत करण्यामागील उद्देश सांगुन विलासजी बनकर यांच्या शेतावर लागवड केलेल्या मिरची, वांगे, कांदा, फुलपिके, उन्हाळी धान व भुईमुंग या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, खतांचे व पाण्यांचे व्यवस्थापन तसेच या पिकांवर येणा-या किडी व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन शेतक-यांना केले. शेतक-यांनी एकात्मीक पिक पध्दतीचा वापर करून उत्पन्न वाढवावे असे सुचविले.

डॉ. सोनाली लोखंडे यांनी पारंपारीक पिके न घेता उन्हाळी भाजीपाला पिके जसे कि मिरची, वांगे, कांदा व टमाटर तसेच फुलपिके घ्यावे असे शेतक-यांना सांगीतले. हेमंतजी शेंदरे यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी असे शेतक-यांना सुचविले.

सदर सभे दरम्यान शेतकरी चर्चासत्रामध्ये शेतक-यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण डॉ. अनिल कोल्हे, डॉ. सोनाली लोखंडे व डॉ. नरेश कापसे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धरमचंद गणविर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल दांदळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता सतिश खडसे, देविदास खरात, राकेश खोब्रागडे व प्रविन निकेसर यांनी विषेश परीश्रम घेतले.