भरधाव जाणारी कार उलटली, शिवणी येथील घटना

भरधाव जाणारी कार उलटली, शिवणी येथील घटना

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी महा मार्गावर शिवनी गावात भरधाव वेगाने येणारी चार चाकी वाहन क्र.MH31DV3738 बस स्टॅन्ड जवळील रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली. गाडीची दशा बघून चालकाचे जागेत प्राण गेले असे वाटले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गडचिरोली कडून चामोर्शी कडे चार चाकी वाहन भरधाव वेगाने येत होती. शिवनी गावा जवळ आल्या नंतर बस स्टॅन्ड जवळ चालकाचा नियंत्रण सुटल्याने गाडी रोड च्या बाजूला जाऊन पलटी झाली. मिळालेल्या माहिती नुसार वाहन चालक हा मध्यपान करून गाडी चालवत असल्याचे कळले.अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.