टिप्पर व सुझुकी कार मध्ये जबरदस्त धडक.
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर
मो 9096817953
भिवापुर.नागपूर – गडचिरोली महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ उमरेड कडून येणारा टिप्पर
क्रमांक MH 40 AK 7701 ने समोर जाणाऱ्या सुझुकी मारोती कार क्रमांक MH 04 JB 0062 ला जबर धडक दिली. त्यात सुझुकी मारोती कारचे काच फुटले व लगतच्या भागाचे नुकसाना झाल्याने काही वेळ टिप्पर चालक व कार चालक यांच्यात शाब्दीक वाद चांगलाच रंगला होता. सदर घटना दीं २७ ,सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरात नागरीकांची घटनास्थळी एकच गर्दी जमली होती. सदर रस्त्याचे काम चाल असन यामहामार्गावर एकसारखी वाहतूक सुरु असते. त्यामुळे हा महामार्ग जिवघेणा ठरू पाहत आहे. काही वेळात वाहतूक पोलिस अधिकारी आले त्यांनी दोन्ही चालकांना शांत केले. वाहतूक पोलिसांनी दोन्ही वाहन चालकांना पोलिस स्टेशन येथे बोलाविण्यात आले.