जालना जिल्हातील 43 कोरोना बाधित रुग्णांचे गावातुन पलायन.

49

जालना जिल्हातील 43 कोरोना बाधित रुग्णांचे गावातुन पलायन.

जालना जिल्हातील 43 कोरोना बाधित रुग्णांचे गावातुन पलायन.
जालना जिल्हातील 43 कोरोना बाधित रुग्णांचे गावातुन पलायन.

सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतोनीधी✒
जालना,दि.27 एप्रिल:- जालना जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टाकळी भोकरदन येथे मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 43 लोकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाने सर्वीकडे खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने या कोरोना वायरस बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर नेण्यात येणार असे सुरु असताना अचानक सर्व कोरोना वायरस बाधित गावातून फसार झाले आहे.

टाकळी भोकरदन या गावात साडेअकराशे लोकसंख्या आहे. गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. त्यानंतर शनिवारी दि.24 ला ग्रामपंचायत कार्यालयात 131 गावक-याची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी दि 26 ला सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तब्बल 43 गावकरी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांना रुग्णांना तातडीने कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. मात्र, बाधित रुग्णांनी कोविड सेंटरला जाण्यास नकार देत सहकार्य करीत नसल्याने अखेर आरोग्य विभागाने भोकरदन पोलिसांना पाचारण केले. पोलिसांचे वाहन गावात दाखल होताच बाधित रुग्णांनी गावातून पळ काढला. त्यामुळे आलेल्या पथकाला एकही रुग्ण घरी न सापडल्याने पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. या प्रकाराने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.