जळगाव जिल्हात आज कोरोनाने घेतले 23 बळी, 1012 रुग्णांची भर.

55

जळगाव जिल्हात आज कोरोनाने घेतले 23 बळी, 1012 रुग्णांची भर.

जळगाव जिल्हात आज कोरोनाने घेतले 23 बळी, 1012 रुग्णांची भर.
जळगाव जिल्हात आज कोरोनाने घेतले 23 बळी, 1012 रुग्णांची भर.

✒विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒
जळगाव,दि.27 एप्रिल:- जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना वायरसने मृत्यु होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे. मंगळवारी जळगाव जिल्ह्यात 23 कोरोना वायरस बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पैकी पाच जण जळगाव शहरातील आहेत. आज एक हजार 12 नविन कोरोना वायरस बाधित रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे आज 995 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले असल्याचे समोर आले आहे.

जळगावात मंगळवारी प्राप्त आठ हजार 123 अहवालांपैकी एक हजार 12 रुग्ण कोरोना वायरस बाधित आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख 18 हजार 928 वर पोचली आहे, तर 995 कोरोना वायरस बाधित रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही एक लाख पाच हजार 901 झाला आहे.

जलगाव जिल्ह्यात मंगळवारी 23 रुग्णांचा कोरोना वायरसने बळी घेतला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा दोन हजार 122 वर पोचला आहे.

जळगाव ग्रामीण 56, भुसावळ 49, अमळनेर 46, चोपडा 53, पाचोरा 59, भडगाव 33, धरणगाव 27, यावल 26, एरंडोल 100, जामनेर 59, रावेर 96, पारोळा 36, चाळीसगाव 64, मुक्ताईनगर 17, बोदवड 120, अन्य जिल्ह्यांतील 07.